पोटच्या पोरीला १ लाख रूपयांना विकले!पतीच्या सुटकेसाठी महिलेचे पाऊल, पुढे जे घडले ते…

माटुंगा पोलिसांनी धडक कारवाई करत मुंबई, गुजरात आणि कर्नाटकमध्ये पसरलेल्या आंतरराज्यीय बाल तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आठ महिलांसह नऊ जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या या महिलांमध्ये एका 32 वर्षीय महिलेने स्वतःचे मूल 1 लाख रुपयांना विकले होते. तुरुंगात असलेल्या पतीला जामीन मिळवण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने आपली मुलगी विकल्याचे महिलेने सांगितले. आरोपी महिलेच्या सासूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

अधिकाऱ्यांंनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीने त्याच्या गर्भवती पत्नीसोबत भायखळा कारागृहात झालेल्या भेटीदरम्यान तिच्याजवळ जामिनासाठी पैशांच्या गरजेबाबत चर्चा केली होती. यानंतर तिने पैसे उभे करण्यासाठी आपल्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. महिलेने आपल्या मुलीला सुमारे एक लाख रुपयांना विकले.

महिलेच्या सासूच्या तक्रारीवरून कारवाई

मुलीला विकण्याचा हा प्रकार तिच्या सासूला कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तक्रारीच्या आधारे माटुंगा पोलिसांनी तपास सुरू केला असता उल्हासनगर, सुरत, वडोदरा आणि कर्नाटकसह अनेक ठिकाणी मुलीचा शोध घेतला. यानंतर पोलिसांच्या पथकाने या व्यवहारात सहभागी असलेल्या आठ मध्यस्थांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *