कांजूरमार्गजवळ टँकर उलटला, जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर ट्रॅफिक जॅम

कांजूरमार्गजवळ टँकर उलटला, जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर ट्रॅफिक जॅम

कांजूरमार्गजवळच्या गांधीनगर पुलावर टँकर उटल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर ही दुर्घटना झाली आहे. त्यामुळे जोगेश्वरीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  मुलुंड, कांजूरमार्ग वाहतूक रखडली आहे.

या अपघातामुळे मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

सकाळच्या वेळेत कामासाठी बाहेर पडणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. गेल्या 2 तासांपासून वाहतूक ठप्प झाल्यानं ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मुंबईकरांच्या तोंडाला फेस आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *