राष्ट्रपती पदकविजेत्या पोलिसाची अटक बेकायदा, तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

हत्येच्या प्रकरणात सदोष तपास केल्याचा आरोप करून राष्ट्रपती पदकविजेत्या पोलिसाला केलेली अटक उच्च न्यायालयाने नुकतीच बेकायदा ठरवली. तसेच, प्रतिष्ठित पोलीस अधिकाऱ्याच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना त्याला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.

सातारास्थित पोलीस अधिकारी संभाजी पाटील यांना अटक करण्याचा निर्णय योग्य पद्धतीने आणि विचारपूर्वक अंमलात आणला गेला नाही. त्यांना तातडीने अटक करावी असे हे अपवादात्मक किंवा दुर्मिळात दुर्मिळ प्रकरणही नव्हते. किंबहुना, पाटील यांच्यावरील आरोप लक्षात घेता त्यांच्यावर दाखल गुन्हा हा जामीनपात्र होता. त्यामुळे असे असतानाही त्यांना बेकायदेशीररित्या अटक करण्यात आल्याचे ताशेरे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना ओढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *