अजितदादांचा शिलेदार थेट पंढरपुरात ! दादा मुख्यमंत्री व्हावे म्हणुन विठुरायाला घातले साकडे

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. त्यातच, अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सतीश बाराणे यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायला साकडे घातले आहे.

तसेच त्यांनी पंढरपूर येथून तुळशीहार, विणा, शाल, पगडी आणून अजितदादांच्या मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, युवा नेते सतिश बारणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *