विमानात मानवी बॉम्बची धमकी; अंधेरीतील महिलेच्या नावाने धमकी

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात मानवी बॉम्ब असून तिच्याकडे दहशतवाद्यांचे ८० ते ९० लाख रुपये असल्याच्या धमकीचा दूरध्वनी दिल्ली नियंत्रण कक्षाला आला होता. याबाबत तातडीने मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. महिलेला अडकवण्यासाठी हा दूरध्वनी करण्यात आल्याचा संशय आहे. विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईत आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातून गौरी बारवाणी नावाची महिला प्रवास करीत असून ती महिला मुंबईतील वर्सोवा येथे राहते. दिल्लीहून ती परदेशात जाणार असून तिच्याकडे ८० ते ९० लाख रुपये आहेत. तिच्याकडे दहशतवाद्यांचे पैसे असून ती मानवी बॉम्ब आहे. ती परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी लंडनला जात असल्याची माहिती दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दिली. याबाबत दिल्ली नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच विमानतळावरील यंत्रणांनी तपासणी केली. महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने हा दूरध्वनी करण्यात आल्याचा संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *