डॉक्टर क्रिकेटचा सामना पाहाण्यात दंग, उपचाराअभावी चिमुकलीचा मृत्यू… शासकीय रुग्णालयातील संतापजनक घटना

शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी एका सात वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूचं कारण संतापजनक आहे. क्रिकेटचा (Cricket) सामना पाहण्यात डॉक्टर व्यस्त असल्याने मुलीवर उपचार  करण्यास त्यांनी नकार दिल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधल्या बदायूच्या शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. 7 वर्षांच्या सोफिया नावाच्या मुलीला उपचारासाठी बदायू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोफियाचे वडिल नाजिम गंभीर अवस्थेत मुलीला घेऊन शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचले. पण डॉक्टरांनी मुलीवर उपचार करण्यास नकार दिला. उपचाराअभावी या मुलीचा अखेर मृत्यू झाला.

नाजिम हे मुलीवर उपचारासाठी डॉक्टरांना विनवी करत होते. पण अनेक तास उलटल्यानंतरही डॉक्टर त्या मुलीकडे फिरकलेही नाहीत. रुग्णालयातील डॉक्टर्सने मुलीवर उपचार करण्यास चक्क नकार दिला. डॉक्टर टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहाण्यात दंग होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यादरम्यान मुलीची प्रकृती आणखी खालावली, अखेर आईच्या कुशीतच मुलीने अखेरचा श्वास घेतला. मुलीच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आरोपी डॉक्टरांवर कठोर कारवाई मागणी आता केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *