इस्त्रायलवर बोलू काही

इस्त्रायलमधले कोणतेही झाड उगवलेले नाही,  तर ते लावलेलेच आहे.  तेथील सुजाण नागरीक झाडाचे पान न् पान जपतोय.  रोपटयांना लहान मुलासारखे वाढवतोय.   लोकांनी  स्वत:वर ”गरज नसताना पाने फुले तोडावयाची नाहीत, अशी कायद्याची नाही, तर एैच्छिक बंदी स्वत:वर लादून घेतली आहे”.  असे वक्तव्य श्री. हेमंत साने यांनी केले.

पर्यावरण आणि पर्यटन या दोन्ही घटकाविषयी प्रचंड आस्था बाळगणार्‍या डोंबिवलीतील विविसु डेहरा या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या संस्थेने ‘जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारू स्वच्छंद’  या उपक्रमातील, इस्त्रायलवर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

वरील शब्दसफरीमधे, श्री. हेमंत साने यांच्याशी सुसंवाद साधला, तो श्री. विभाकर शिंत्रे यांनी.  या कार्यक्रमात:

-इस्त्रायलने पाण्याचा थेंब  न थेंब वाया न घालवता,त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी कसा केला,
-वयाची 18 वर्ष पुर्ण केल्यावर देशाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकला 3 वर्ष सैनिकी शिक्षण घेणे आवश्यक आहे ,एवढेच नाही, तर नोकरी करीत असता वर्षातून 1 महिना सैन्य दलात आपली सेवा देणे हे नुसते आवश्यक नव्हे तर कर्तव्य आहे.

-हेवा वाटावा अशी सुबत्ता त्यानी कृषी क्षेत्रात केली आहे. त्यांचा शेतातील वांगी पडवलाएवढी लांब , द्राक्षाचे घड दीड फूट लांब तर कलिंगड भोपळ्याएवढे मोठे असते.

-वैद्यकीय क्षेत्रात त्यानी अमेरिकेच्या बरोबरीने प्रगती केली आहे.
0 (1)
-युध्दसामुग्री, रडार यंत्रणा यांचे तंत्रज्ञान जगाला आश्‍चर्य करावयास लावेल, असे आहे.

-प्रवास चालू असता, एका विमानातून दुसर्‍या विमानात इंधन पूरविन्याचे तंत्र इस्त्राईलने शोधून काढले आणि कार्यान्वितसुद्धा केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *