अमरावती एमआयडीसीत राम इंडस्ट्रिजला भीषण आग

बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्‍या कारखान्‍याला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्‍यात आल्‍यानंतर अमरावती महापालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्‍थळी पोहोचले. अगिनशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर ताबा मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे आकाशात मोठे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *