मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने आयआयटी मुंबईला तब्बल १३० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या या ऐतिहासिक सहकार्यामुळे आता आयआयटी मुंबई या ठिकाणी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा स्थापना होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र उभारणी आणि आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने १३० कोटींची ही देणगी प्रतिज्ञाद्वारे दिली आहे.

‘एमओएफएसएल’चे सह-संस्थापक मोतीलाल ओस्वाल आणि रामदेव अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या १० टक्के इक्विटी, ज्याचे मूल्य सध्या चार हजार कोटी आहे. भारतीय शैक्षणिक संस्थेसाठी हे मोठे योगदान समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या या सामंजस्य करारांतर्गत मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तबब्ल १ लाख १.२ लाख चौरस फूट क्षेत्रफळात स्थापन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *