उपनगरांत पावसाचे पुनरागमन, शहरात पावसाची प्रतीक्षा

जुलै अखेरीस कोसळलेल्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली. अधूनमधून हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर बेहाल झाले होते. दीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी पहाटे उपनगरांत पावसाचे पुनरागमन झाले. दरम्यान, मुंबईत मंगळवारी हलक्या सरींची, तर ठाणे, पालघर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वारे वाहतील, असाही अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *