बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा नालासोपार्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे अमोल पटेल (२९ वर्षे ) आणि कल्पेश सेवक (३५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेतस्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. तर अटक करण्यात आलेल्या दोघांना सहा दिवसांची पोलीस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. म्हाडाची घरे ही सोडतीद्वारेच सोडत पूर्व आणि सोडती नंतरची प्रक्रिया पूर्ण करत म्हाडाच्या माध्यमातूनच वितरित केले जातात. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न जाता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज दाखल करत म्हाडाच्या सोडतीत सहभागी व्हावे असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

भायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन पक्षांच्या देखभालीचा खर्च यंदा आणखी वाढला आहे. या कक्षातील पेंग्विनची संख्या गेल्या सहा वर्षात सात वरून अठरावर गेली आहे. पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबरच खर्चही वाढला असून यंदा तब्बल २० कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या राणीबागेत २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ८ हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला. त्यानंतर सात पेंग्विन या कक्षात होते. मग या पेंग्विनच्या जोड्यांना पिल्ले झाली आणि त्याचाही प्राणीसंग्रहालयाने उत्सव केला. या पेंग्विनच्या पिल्लांचे नामकरणही प्राणीसंग्रहालयाने केला. पेंग्विनची संख्या गेल्या सहा वर्षात वाढून तब्बल १८ वर गेली आहे. यात दहा मादी आणि आठ नर यांचा समावेश आहे. पेंग्विनची संख्या वाढण्याबरोबरच पेंग्विनच्या देखभालीचा खर्चही यंदा वाढला आहे. प्राणीसंग्रहायल व्यवस्थापनाने पेंग्विनच्या देखभालीसाठी तीन वर्षांकरीता निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षांसाठीचा अंदाजित खर्च २० कोटी १७ लाखांवर आहे. तीन वर्षांपूर्वी प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने जेव्हा निविदा मागवल्या होत्या तेव्हा त्याचा खर्च १५ कोटी होता.

पेंग्विन कक्षामध्ये ठराविक तापमान राखावे लागत असल्यामुळे विशेष वातानुकुलित कक्ष आणि पेंग्विनसाठीचे अधिवास तयार केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त आहे. त्यातच पेंग्विनसाठी डॉक्टर, कक्षासाठी अभियंते आणि तंत्रज्ञ यांची सेवा २४ तास तीन पाळ्यांमध्ये द्यावी लागते. तसेच पेंग्विनना खाद्यपुरवठा असा सगळा खर्च यात समाविष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच कंत्राटात दर तीन वर्षांनी १० टक्के वाढ होत असते त्यामुळे हा खर्च वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हे पेंग्विन देऊन गुजरातमधून सिंह आणण्याची योजनाही प्राणी संग्रहालयाने आखली होती. त्याकरीता प्रस्तावही पाठवला होता. मात्र गुजरातमधील जुनागढ येथील साकरबाग प्राणी संग्रहालयाकडे पेंग्विन ठेवण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे त्यांनी पालिकेच्या प्रस्तावाला काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे १८ पेंग्विनची देखभाल महापालिका करीत आहे.

महसूलही वाढला…

पेंग्विनची संख्या आणि देखभाल खर्च वाढलेला असला तरी पेंग्विनच्या आगमनानंतर प्राणीसंग्रहालयाचे महसूलही वाढला असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पेंग्विन कक्षाच्या उभारणीआधी प्राणीसंग्रहालयाचे २०१४ ते २०१७ या तीन वर्षांचे उत्पन्न २ कोटी १० लाख रुपये होते. नंतर हे उत्पन्न दरवर्षी वाढत गेले असून २०२३ मध्ये १२ कोटीचा महसूल जमा झाला तर २०२४ मध्ये गेल्या आठ महिन्यात ५ कोटी ९१ लाखांचा महसूल जमा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *