मिसबाहचा पूर्वीच्या घराचा करार संपल्याने तिने नव्या जागेचा शोध घेतला. दरम्यान फेसबुकवरून तिला वडाळ्यातील घराबाबत माहिती मिळाली. या घरात दोन मुली राहत होत्या. मिसबाहने त्यांच्याशी संपर्क करून तेथे भाड्याने राहण्यास जाण्याचे ठरविले. मात्र, सदर घरात जाण्याआधी एक दिवस घर देणाऱ्या दलालाने मिसबाहला या सोसायटीत मुस्लिमांना प्रवेश नसल्याचे सांगितले. “जर तुम्ही तसे केले तर तुमच्या धर्मावरून तुमच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला त्रास दिला तर त्यास बांधकाम व्यावसायिक किंवा दलाल कायदेशीररित्या जबाबदार राहणार नसल्याचे तुम्हाला लिहून द्यावे लागेल‘ असेही त्याने सांगितले. तसेच तिला तिचे परिचयपत्रक सादर करण्यास सांगण्यात आले. या अटींना मान्यता नसूनही पूर्वीच्या घराचा करार संपल्याने, नव्या घरातील दोन मुलींनी तिला सहकार्य करत नंतर तडजोड करू असे सांगितल्याने मिसबाह त्या घरात राहण्यास आली. मात्र आठवडाभरातच मध्यस्थाने मिसबाहशी पुन्हा संपर्क केला. तसेच पोलिसांना बोलावून घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. ज्यावेळी मिसबाह बांधकाम व्यावसायिकाच्या प्रतिनिधीला भेटली त्यावेळी तिला मुस्लिम भाडेकरू न ठेवण्याचे कंपनीचे धोरण असल्याचे सांगण्यात आले. तसेच तिच्यावर घर सोडण्यासाठी दबावही निर्माण करण्यात आले. सुदैवाने त्याचवेळी एका महिलेने मिसबाहला घर उपलब्ध करून दिल्याने तिची इच्छा नसतानाही तिने घर सोडले.
मुंबईत मुस्लिम असल्याने तरूणीला नाकारले घर
मुंबई – मुस्लिम तरूणाला नोकरी नाकारल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत एका 25 वर्षांच्या मिसबाह कादरी नावाच्या एका तरुणीला मुस्लिम असल्याने घर भाड्याने राहण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. वडाळ्यातील संघवी हाईटसमध्ये पूर्वी राहत असलेल्या दोन मुलींसोबत भाड्याने राहण्यासाठी मिसबाहला परवानगी देण्यात आली नाही.