तब्बल 24 तासांनी लालबागचा राजा जलसागरात विसावला

जनसागराचा निरोप घेऊन निघालेला लालबागचा राजा तब्बल 24 तासांनी जलसागरात विसावला आहे.  आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर कोळी बांधवांनी लालबागच्या राजाला सलामी दिली.

कोळ्यांच्या बोटींनी खोल समुद्रामध्ये राजाला नेलं आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेऊन त्याला निरोप दिला.

दुसरीकडे पुण्यात काल मध्यरात्री उशिरा निघालेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचंही आज पहाटे विसर्जन करण्यात आलं. खरं तर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दगडूशेठची मिरवणूक सुरु होणं अपेक्षित होतं. पण दिरंगाईमुळे हा बाप्पा मध्यरात्री रवाना झाला. दरम्यान आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातल्या सर्व मिरवणुका आटोपण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *