अभिनेता संजय दत्त तीस दिवसांची सुटी संपल्याने शनिवारी पुन्हा येरवडा मध्यवर्ती कारागृहात हजर झाला.
मुंबईतील जानेवारी 1993 मधील साखळी बाँबस्फोटावेळी बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी विशेष टाडा न्यायालयात 2013 मध्ये दोषी सिद्ध झाल्यानंतर त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, शिक्षा भोगताना त्याला पॅरोलच्या निमित्ताने वारंवार मिळत असलेल्या सुटीवरून चर्चा होत आहे.
पत्नी मान्यता दत्त आणि मुलांचा निरोप घेऊन संजय शनिवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगात हजर झाला.

