बीडचा खेळाडू ढाकामध्ये संकटात अडकला, मदतीसाठी धनंजय मुंडेंची धावाधाव;

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा तरुण बांगलादेशच्या ढाकामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र, तो आता ढाकामध्ये अडकवला आहे. सध्या इंद्रजितशी संपर्क होत नाही. त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे इंद्रजितला लवकर मदत पोहोचवावी, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे आवाहन केलं आहे.

इंद्रजित सध्या ढाका शहरातील हॉटेल पॅसिफिकमध्ये अडकला आहे आणि त्याला अचानक अपेंडिसायटिसचा गंभीर आजार झाला आहे. पुढील 72 तासांत त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. परंतु सध्या पोहोचू शकत नाही. त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे, असं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *