मक्का चेंगराचेंगरीत १८ भारतीयांचा मृत्यू

सौदी अरेबियातील मक्का येथे गुरुवारी हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १८ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी शनिवारी सांगितले.

मक्कापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मीना येथील मौंट अराफत आणि मुख्य मशिदीच्या परिसरात जमारातजवळील दोन रस्त्यांवर सैतानाला दगड मारण्यासाठी सुमारे २० लाखांहून अधिक यात्रेकरू उपस्थित होते.

या यात्रेकरूंना पुढे जाण्यास वाव न मिळाल्याने चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आणि त्यात विविध देशांतून आलेल्या ७१७ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *