पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे मानाच्या गणपतीनंतर मंडई अणि दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानेही हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. 123 वर्षांच्या इतिहासात प्रथमच या सर्व मंडळांच्या गणपती मूर्तींचं हौदात विसर्जन होणार आहे.
पहिला मानाच्या गणपती असलेल्या कसबा गणेश मंडपात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. अधिकाधिक गणेश मूर्तींचं विसर्जन हौदात व्हावं, यासाठी मानाच्या गणपतींचा पुढाकार आहे.
परंतु या निर्णयाला सनासन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे गणेश मंडळ आणि सनातन संस्था यांच्यात वाद सुरु आहे.

