जम्मू-काश्‍मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्‍मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद

राष्ट्रविरोधी कारवायांसाठी करण्यात येणाऱ्या माहितीच्या देवाणघेवाणीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जम्मू-काश्‍मीर सरकारने ईदच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इंटरनेट सेवा या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर दुष्परिणाम करू शकतात त्यामुळे राज्याचे काश्‍मीर प्रभागाचे पोलिस महानिरीक्षक जावेद गिलानी यांनी आदेश काढले आहेत. त्यामध्ये सर्व इंटरनेट सेवा पुरवठादारांना 25 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजल्यापासून 27 सप्टेंबर रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशामध्ये जीपीआरएस, टूजी, थ्रीजी तसेच ब्रॉण्डबॅण्ड सेवाही बंद ठेवण्यास सांगितले आहे. काही राष्ट्रविरोधी घटकांकडून आज (शुक्रवार) जम्मू-काश्‍मीरमध्ये भारतविरोधी घोषणा देऊन पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *