भारतीय क्रिकेट संघटनेचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याची बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोलकत्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली.
‘जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर ‘कॅब‘चे अध्यक्षपद कोण‘ या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले. त्यापूर्वी गांगुलीने कालच ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. मात्र, भेटीत झालेल्या चर्चेबद्दल काहीच माहिती समोर आली नव्हती. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “”दालमिया यांचे निधन झाल्यामुळे उद्भवलेल्या या अडचणीच्या प्रसंगी गांगुलीच “कॅब‘ला योग्य नेतृत्त्व देऊ शकतो.‘‘ गांगुली सध्या संयुक्त सरचिटणीस या पदावर कार्यरत होता. दालमिया यांचा मुलगा अभिषेक आता संयुक्त सरचिटणीस होतील. अर्थात, या निर्णयांना “कॅब‘च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी आवश्यक असेल.

