आता घरबसल्या वीज बिल भरा, महावितरणचं मोबाईल अॅप

आता घरबसल्या वीज बिल भरा, महावितरणचं मोबाईल अॅप

वीज बिल भरण्यासाठी आता तुम्हाला तासनतास रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. कारण, महावितरणच्या अधिकृत अॅपमुळे घर बसल्या विजेचे बिल भरणे आता सोपं झालं आहे.

स्मार्ट फोनच्या प्ले स्टोरद्वारे महावितरण हे अॅप मोफत डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपद्वारे केवळ वीज बिल भरणे सोपे झाले असं नाही तर विजेचे नवीन कनेक्शन घेणे, विजेच्या संदर्भात काही तक्रारी नोंदवणे, विजेची चोरी संदर्भात माहिती देणे. या सुविधा देखील अहोरात्र उपलब्ध असणार आहेत.

सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, शेतकरी, व्यापारी, गृहिणी अशा सर्वांना हे अॅप हाताळता येऊ शकतं. महावितरणचे अॅप आतापर्यंत दहा हजाराहून अधिक स्मार्ट फोनधारक असलेल्या वीज ग्राहकांनी डाऊनलोड केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *