देशभरात बकरी ईदचा उत्साह

देशभरात बकरी ईदचा उत्साह

देशभरात आज ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी सर्वांना ईद उल जुहानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईद उल जुहाच्या मुस्लीम बांधवाना ट्विटरहून शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद निमित्त अल्लाहच्या प्रती प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त करण्यासाठी ही ईद साजरी केली जाते. ईद उल जुहानिमित्त मुस्लिम बांधव नमाज पठणानंतर अल्लाहला बकरीची कुर्बानी देतात.

यादिवशी अनेक मुस्लीम बांधव गरिबांना दान देतात.

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईद उल जुहा. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते.

आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईद उल जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *