दलाई लामांचे वक्तव्य चुकीचे

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचे वक्तव्य अत्यंत वैयक्तिक असून चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या सुधा रामलिंगम यांनी व्यक्त केल्या आहेत.

रामलिंगम म्हणाल्या, “एक महिलाही दलाई लामांची उत्तराधिकारी बनू शकते याचे मी स्वागत करते. परंतु वास्तविक ते एका व्यक्तीच्या सौंदर्याविषयी बोलले आहेत. ते ही शारिरीक सौंदर्याबद्दल. हे बोलणे निर्दयी आहे‘ अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तसेच “मला वाटते की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यावर अवलंबून असते. हा अतिशय वैयक्तिक प्रश्‍न असून त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायला नको होती‘ असेही रामलिंगम पुढे म्हणाल्या. “त्यांच्या या वक्तव्यामागे त्यांचा काय उद्देश आहे ते मला माहित नाही. ते अगदी सहज बोलले असतील. पण हे नक्कीच राजकीयदृष्ट्या योग्य नाही‘ असेही त्या पुढे म्हणाल्या. माझी उत्तराधिकारी जर एखादी महिला होणार असेल तर ती सुंदर आणि आकर्षक असायला हवी, असे वक्तव्य दलाई लामा यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *