साईबाबा हे देव नसल्याने त्यांची पूजा करायला नको, असे वक्तव्य करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यावतीने वकिलाने उच्च न्यायालयात माफी मागितली आहे.
साईबाबा हे मुस्लिम होते. यामुळे हिंदू देव-देवतांसोबत त्यांची पूजा करायला नाही पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य शंकराचार्यांनी केले होते. शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान शंकराचार्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने माफी मागितली. यामुळे शंकराचार्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीने आपला अर्ज मागे घेतला आहे. शंकराचार्यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझ्या वक्तव्याचा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

