मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम -नारायण राणे

मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम -नारायण  राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच सर्वाधिक खून आणि दरोडे होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे मुख्यमंत्री गृह खातं सांभाळण्यास असक्षम असल्याचं सिद्द होतंय, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा टार्गेट केलंय.

ठाण्यातील गणेश उत्सव मंडळांना भेट देण्यासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. दुष्काळी भागात अजून शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही तरीही सरकार मराठवाड्यातल्या चारा छावण्यात बंद करतंय, असा आरोपदेखील यावेळी नारायण राणे यांनी केलाय.

मनसेच्या ‘अधिकृत’ या सोशल प्लॅटफॉर्मवरून नुकतेच राज-उद्धव ठाकरे यांचे जुने फोटो अपलोड करण्यात आले होते… एकेकाळच्या सेना नेत्याला याविषयी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ‘निवडणुका जवळ आल्या की ठाकरे परिवार लोकांच्या भावनेशी खेळतात… सत्तेसाठी ते काहीही करू शकतात’ अशी प्रतिक्रिया राणे यांनी व्यक्त केली. तसंच राज आणि उद्धव एकत्र आल्याने आम्हाला काही फरक पडत नसल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *