फायरिंग रेंजमध्ये युद्धाभ्यासदरम्यान अपघात, मेजर ध्रुव यादव शहीद

फायरिंग रेंजमध्ये युद्धाभ्यासदरम्यान अपघात, मेजर ध्रुव यादव शहीद

राजस्थानच्या जैसलमेरमधील पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एका अपघातात भारतीय लष्करातील मेजर ध्रुव यादव शहीद झाले. टँक फायरिंगदरम्यान एक गोळा फुटल्याने मेजर ध्रुव यांचा जागीच मृत्यू झाला. कोर्ट ऑफ इन्क्वायरीने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या घटनेत काही जवान जखमी झाल्याचंही कळतं. देशातील सर्वात मोठ्या पोखरण फायरिंग रेंजमध्ये सैन्याच्या विविध युनिट्सचं नियमित युद्धाभ्यास सुरु असतो. सध्या या फायरिंग रेजमध्ये भारतीय सैन्याच्या 75 आर्म्ड रेजिमेंटचा युद्धाभ्यास सुरु आहे. याचदरम्यान टँकमधून निघालेला गोळा लक्ष्यापर्यंत पोहोचण्याऐवजी तिथेच फुटला

या दुर्दैवी घटनेत मेजर ध्रुव यादव यांचा जागीच मृत्यू झाला. जोधपूरमध्ये लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनिष ओझा यांनी या वृत्ताला दुजोरा देत, या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

मेजर ध्रुव हे मूळचे हरियाणाचे रहिवासी असून त्यांचं वय केवळ 32 वर्ष होतं.

याच ठिकाणी झाली होती अणुबॉम्बची चाचणी

राजस्थानचं पोखरण हे तेच क्षेत्र आहे जिथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपे. यांनी त्यांच्या कार्यकाळात अणुबॉम्ब चाचणी घेतली होती. तेव्हापासून पोखरण हे भारतीय लष्करासाठी महत्त्वाचं स्थान आहे. इथेच सैन्याचा युद्धाभ्यास होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *