मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला दाम्पत्याचा बळी

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डा चुकवताना समोरून येणा-या वाहनाला मोटारसायकल धडकल्यामुळे मोटारसायकलवर असलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. विक्रम पद्माकर कोळी(३२) व स्मिता विक्रम कोळी अशी मृतुमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे दोघे पेण तालुक्यातील कोळवे येथे राहणारे आहेत. आज दुपारी जिते गावाच्या हद्दीत हा अपघात घडला.

विक्रम पद्माकर कोळी व स्मिता विक्रम कोळी हे दोघे मोटारसायकलवरून पनवेलकडून पेणच्यादिशेने जात होते. त्यांची मोटारसायकलवरून जिते गावच्या हद्दीत आली असता रस्त्यातील खड्डा चुकवताना समोरून येणारया तीनचाकी टेम्पोला मोटारसायकल धडकली त्यात कोळी दाम्पत्य जागीच ठार झाले.

मुंबई-गोवा महामार्गावर पडलले खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारया गणेश भाक्त्नाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काही खड्डे बुजवण्यात आले. परंतु मोठे खड्डे तसेच आहेत. आज अखेर या खड्ड्यानीच तरुण दाम्पत्याचा बळी घेतला.

सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रायगड जिल्ह्यात खलपुरजवळ अपघात होऊन सहाजणांचा बळी गेला होता. त्यानंतर जिल्ह्यात हा अपघात घडला. २४ तासात दोन वेगवेगळ्या अपघातात रायगड जिल्ह्यात आठजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऐन गणेशोत्सवात हे अपघात घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *