गणपतीला प्रिय असणारी एकवीस पत्री अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करून आरोग्यदायी प्रसन्नता पसरवते. आणि म्हणूनच एकवीस पत्री गणपतीस प्रिय असते. गणपतीला ती भक्तीभावानं वाहताना ही एकवीस पत्री आपल्यालाही कशी उपयुक्त असते हे समजून घ्यायला काय हरकत आहे?
पावसाळ्यात शरीराचं बल कमी झालेलं असतं. भूकही मंदावलेली असते. हवेत रोगकारक जंतूृंचा प्रभाव वाढलेला असतो. दूषित पाण्यानं विविध प्रकारचे पोटाचे व आतडय़ांचे आजार होत असतात. वातदोषानं सांधेदुखी, पित्तानं अॅसिडिटी तर कफदोषानं सर्दी-पडसे-ताप यांसारखे आजार वरचेवर होत असतात. अशावेळी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणोशाचं आगमन होतं. गणोशाची 21 नावं ही गणोशपत्रींमधील औषधी गुणधर्माना सूचित करणारीच आहेत. पावसाळ्यातल्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचं सामथ्र्य या एकवीस पत्रीत असतं. आणि म्हणूनच या पत्रींची ओळख होणं गरजेचं आहे. गणपतीची एकवीस नावं एकवीस पत्रीतील गुण दर्शवणारीच आहे.
1) ।। सुमुखाय नम:।।- मधुमालती
मधुमालतीची पानं तुरट व कडू रसाची व गुणानं थंड असतात. सुवासिक व मनाला प्रसन्नता देणारी ही वेल मुखरोगांना दूर करते व श्रीगणोशाच्या ‘सुमुख’ नावाप्रमाणोच ती आपल्यालाही सुंदर व निरोगी चेहरा मिळवून देते. दात व हिरडय़ांच्या आजारांवर तसेच तोंड आलेले असताना तिच्या पानांच्या काढय़ानं गुळण्या करतात. चेह:यावरील डाग, वांग व पिटिकाजन्य त्वच्याविकारांसाठी मधुमालतीचं तेल वापरतात.
2)।। गणाधिशाय नम:।। – माका
माका केसांच्या आरोग्यासाठी सवरेत्तम वनौषधी आहे. केसांना नैसर्गिक काळा रंग मिळवून देते म्हणून तिला ‘केशराज’ असेही म्हणतात. केस गळणं, अकाली पांढरे होणं, केसात कोंडा होणं, टक्कल पडणं अशा विविध केसांच्या समस्यांवर माक्याचं तेल वापरलं जातं. पावसाळ्यातील खोकल्यावर व यकृतविकारांवर माक्यापासून बनवलेली आसव आरिष्टे वापरतात.
3) ।। उमापुत्रय नम:।।- बेल
पावसाळी वातावरणानं वारंवार पोट बिघडून जुलाब होत असताना बेलाचा मुरब्बा खायला देतात. लहान मुलांना उष्णतेमुळे होणा:या जुलाबावरील हे घरगुती औषध आहे. बेलपानाचा लेप त्वचेची दरुगधी घालवणारा व शरीराची सूज कमी करणारा आहे. बेलपानाचं चूर्ण नियमित घेतल्यास शरीरावरील मेद कमी होतो म्हणून मधुमेही रुग्ण त्याचा वापर करतात. बेलफळापासून बनवलेल्या तेलानं शरीराचा दाह कमी होतो.
4) ।। गजाननाय नम:।। – दूर्वा
भारतभर सर्वत्र उपलब्ध होणा:या दूर्वामध्ये पावसाळ्यात सर्वाधिक रसनिर्मिती होत असते. दूर्वाचे विविध आजारांवर औषधी उपयोग आहेत. दूर्वा थंड गुणांच्या व पित्तशामक आहेत. रक्तस्त्रवजन्य विकारांवर त्यांचा विशेष उपयोग होतो. गोवर, कांजण्या व उष्णताजन्य पिटिकांमध्ये दूर्वाचा रस प्यायला देतात. गर्भस्त्रव होऊ नये म्हणून गर्भिणीस दूर्वाचा रस देतात. लहान बालकांच्या बुिद्धवर्धनासाठी दूर्वाधृताचा वापर केला जातो.
5)।। लंबोदराय नम:।।- बोरी/ बदर
सुटलेले पोट हे सुखवस्तू मनुष्याचे लक्षण समजलं जातं. परंतु हे असं पोट सुटणं आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही म्हणून बोरीचा काढा त्याला द्यावा, असे गणोशाच्या नावातून सूचित होतं. भस्मक नावाच्या रोगात रुग्णास सारखी भूक लागते तेव्हा बोरीच्या बियांचं चूर्ण त्याला देतात. मूळव्याधीच्या त्रसात बोरीच्या मुळांचा काढा देतात. पानांचा लेप शरीराचा दाह कमी करतो.
6) ।। हरसूनवे नम:।।- धोत्र
शंकराला विषौषधी फार आवडतात म्हणून त्याला धोत्रही आवडतो. पित्याप्रमाणोच गणोशानेही धोत्र्याच्या पानास जवळ केलेले आहे. धोत्र्याचा औषधी वापर फार काळजीपूर्वक केला जातो. धोत्र्याच्या पानांमध्ये कृमीनाशक गुणधर्म आहे. पानांचा लेप वेदना कमी करणारा आहे व धूर श्वसननलिकांची सूज घालवणारा आहे. पूर्वी कुत्र चावल्यावर जी विषबाधा होते त्यावर धोत्र्याचं औषध देत असत कारण त्यावर आधुनिक अॅलोपॅथिक औषधं उपलब्ध नव्हती.
7) ।। गजकर्णाय नम:।।- तुळस
‘गजकरण’ नावाच्या त्वचाविकारावर तुळशीच्या पानांचा रस लावल्यास फार लाभ होतो. चवीला तिखट व गुणांनी उष्ण असणारी तुळस विविध प्रकारच्या सर्दी व थंडीतापावरील उत्तम औषध आहे. खोकल्यावर मधाबरोबर तुळशीचा रस पाजतात. तुळशीचा रस यकृत्ताेत्तेजक आहे. पावसाळ्यात मंद झालेला जठराग्नी वाढवण्यासाठी तुळशीची दोन पानं जेवणापूर्वी चावून खावीत असा नियम आहे.
8) ।। वक्रतुंडाय नम:।।- शमीपत्र
शमीचं वृक्ष रोगांचं शमन करतो म्हणून त्याला ‘शमी’ म्हणतात. शमीच्या पानांची मूळव्याधीचा त्रस कमी होण्यासाठी धुरी करतात. रक्तपित्त व अतिसारावर शमीच्या सालीचा काढा वापरतात. विशेषत: कफ व वातविकारांवर शमी वापरतात. पूर्वीच्या काळात अंगावरील केस काढण्यासाठी शमीच्या फळांपासून औषध बनवलं जाई.
9) ।। गुहाग्रजाय नम:।। – आघाडा
आघाडय़ाचा क्षार औषधात विशेषत्वानं वापरला जातो. शरीरातील गाठी घालविण्यासाठी हा क्षार वापरतात. आघाडय़ाच्या पानांचा रस काविळीत देतात. पानांमधील मूत्रल गुणधर्मामुळे, पोटात पाणी होऊन जलोदर होतो तेव्हा पानांचा रस देतात.
1क्) ।। एकदंताय नम:।।- बृहती
बृहतीच्या बियांचा धूर, किडलेल्या दातांसाठी लाभदायक असतो. तसेच पानांचा लेप गाठींवर लावतात. बृहती ही उत्तम श्वास-कांस नाशक व स्वेदजनन औषध आहे. बृहतीच्या पानांच्या धुरीनं श्वसननलिकेची सूज कमी होते. सांधेदुखीवर पानांचा लेप करतात. दशमुळांपैकी एक औषध बृहती आहे व विविध प्रकारच्या वातव्याधींवर कार्यकारी आहे.
11) ।। विकटाय नम:।। – कण्हेर
कण्हेरीच्या मुळांत तीव्र विष असतं. कण्हेरीच्या पानांचा वापर बाह्योपचारार्थ केला जातो. पानांचा लेप केसांच्या चाई किंवा उंदरी या आजारावर करतात. कण्हेरीच्या पानांपासून बनवलेलं तेल त्वचाविकारावर वापरतात. पानांचा काढा व्रण धुण्यासाठी वापरतात.
12) ।। कपिलाय नम:।।- रूई
रूईच्या पानांपासून बनवलेला क्षार पंचकर्मातील वमन व विरेचनार्थ वापरत असत. विविध त्वचाविकारात कृमीरोगात व व्रणांचा उपचार करण्यासाठी रूईच्या पानांचा काढा व धुरी वापरतात. रुईच्या पानांपासून बनवलेले अर्कलवण प्लीहेच्या सुजेवरील औषध आहे.
13) ।। गजदन्ताय नम: ।।
– अजरुन
अजरुन हाडांना जोडणारा व हृदयास पोषण देणारा आहे. हृदय व धमन्यांचं शैथिल्य हृदयविकारांस कारणीभूत असतं. धमन्यांचं शैथिल्य घालवलं की हृदयास नीट कार्य करता येतं. बलहीन व नरम पडलेल्या धमन्यांमधील दाब कमी असेल तर हृदय फुगलेले म्हणजे ्िर’ं3ी िअसते. अजरुन सालीचा क्षीरपाक दिल्यास धमन्यांची व हृदयाची सूज कमी होते. अशावेळी अजरुनानं रक्तवाहिन्यांचे संकोच होऊन रक्तदाब वाढतो परंतु त्यामुळे नाडीचे ठोके जोरदार व नीट पडू लागतात. हृदयाचा आरामकाळ लांब होतो.
14) ।। विघ्नरानाय नम:।।- विष्णूक्रान्ता
विष्णूक्रान्ताच्या पंचागाचा औषधात उपयोग करतात. ही त्रिदोषनाशक आहे. लहान मुलांच्या ताप-दमा व खोकल्यात गुणकारी औषध आहे. विष्णूकांता बुद्धिवर्धक असून चांगली व शांत झोप आणणारी आहे.
15) ।। बटवे नम: ।।- डाळिंब
डाळिंब वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांवर कार्यकारी आहे. बहुरूप म्हणजे लहान बालकाचं रूप होय. डाळींब बालरोगांत विशेषत: वापरतात. गरोदर व बाळंतपणात जुलाब होतात तेव्हा डाळिंबाचा वापर करतात. लहान बालकांच्या जुलाबावर डाळींब हे उत्तम औषध आहे.
16) ।। सुराग्रजाय नम: ।।- देवदार
देवदाराचे लाकूड सुगंधित असतं. त्वचाविकारांत वापरतात. देवदारचा काढा सूज, गंडमाळा, आमवात या विकारात देतात. देवदारचा काढा हृदयाची धडधड वाढलेली असताना देतात.
17) ।। भालंचद्राय नम : ।।- मखा
मखा गुणांनी थंड व सुगंधित आहे. चरकानुसार मख्याची पानं शिरोविकारांवर गुणकारी आहेत. मख्याच्या पानांचा रस दद्रू (ीू1ीें) नावाच्या त्वचाविकारांत वापरतात. शरीराचा दाह कमी करण्यासाठी मख्याचा लेप देतात. मखा थंड असल्यानं रक्त व पित्त रोगांत वापरतात.
18) ।। हेरंबाय नम : ।।- पिंपळ
स्त्रियांना गर्भधारणा व्हावी म्हणून पिंपळाच्या फळांचं चूर्ण देतात. पिंपळाच्या सालीचा काढा विविध प्रकारच्या स्त्रीरोगांत करतात. पिंपळाचे सर्व भाग औषधी आहेत. प्रदर विकारात व जुलाबावर पिंपळाच्या शृंगाचं चूर्ण देतात. फळानं पोट साफ होते.
19) ।। चतुभरुजाय नम: ।।- चमेली
चमेलीच्या पानांचा वापर हातापायांच्या भेगांवर करतात. चमेली व्रणांना बरं करणारी व मुखरोगावर कार्यकारी आहे. हिच्या पानांचा काढा बनवून वापरतात. चमेलीची पानं कृमीहन व जंतुनाशक आहे.
20) ।। विनायक्राय नम: ।।- केवडा
केवडय़ामुळे सुंदर वर्ण प्राप्त होतो म्हणून सुंदर त्वचेला केतकी वर्णाची उपमा दिली जाते. केतकीच्या क्षाराचा वापर शरीरातील गाठी घालवण्यासाठी करतात. कष्टानं व थांबून होणा:या लघवीच्या त्रसासाठी केतकीच्या पानांचा रस देतात.
21) ।। सर्वेश्वराय नम: ।। – अगस्ती
हादग्याच्या पानांपासून बनवलेलं तूप रातांधळेपणावरील औषध आहे. ‘अपस्मार’ या मनोविकारांत हादग्याच्या पानांच्या रसाचं नस्य करतात. पोटदुखीवर हादग्याच्या पानांच्या रसात हिंग व सैंधव टाकून प्यायला देतात.
-
(सूचना : या लेखामध्ये दिलेली वनस्पतींच्या औषधी गुणधर्माची माहिती वाचून त्यांचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये.)

