जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे आणि सुरक्षा अभियान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा कार्यशाळा दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्रादेशिक मनोरुग्णालय मनोरंजन हॉल ठाणे येथे पार पाडली.

दरवर्षीप्रमाणे रस्ता सुरक्षा सप्ताह राज्यावर पाळला जातो यावर्षी देखील हा सप्ताह पाळण्यास सुरुवात झाली. जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे  आणि सुरक्षा अभियान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा कार्यशाळा दिनांक 8 फेब्रुवारी 2024  रोजी प्रादेशिक मनोरुग्णालय मनोरंजन हॉल ठाणे येथे पार पाडली.

ही कार्यशाळा सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. रस्ता सुरक्षा कार्यशाळेत डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक) डॉ. विलास  पवार,  (सुरक्षा अभियान ट्रस्ट संस्थापक/अध्यक्ष) व  डॉ. नेताजी मुळीक (वैद्यकीय अधीक्षक) व रस्ता सुरक्षा संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अनुराधा जाधव यांनी केले. अध्यक्ष डॉ. विलास पवार यांनी सुरक्षा अभियान कामकाजाबद्दल सविस्तर माहिती दिली.  उपस्थित मान्यवर यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात डॉ.विलास साळवे, डॉक्टर, नर्सेस व इस्पितळ स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा विषयी विविध चित्रफिती कार्यशाळेत दाखवण्यात आल्या. अॅड. विराट विलास पवार यांनी कार्यशाळेतील उपस्थित प्रतिक्रिया जाणून घेतल्या. रस्ता सुरक्षा विषयावर कार्यशाळेत भाग घेतलेल्यांनी फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन अॅड. विराट विलास पवार यांनी केले.

दुपारच्या सत्रामध्ये cpr बददल माहिती डॉ. रुपाली आणि डॉ. प्रियंका यांनी दिली. इस्पितळ अधिकारी यांनी ही कार्यशाळा पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न केले. हॉलच्या परिसरात चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रस्ता सुरक्षा विषयावर कार्यशाळेत भाग घेतलेल्यांना प्रमाणपत्रांचे व नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी सेफ्टी मॅन या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

उपस्थित सर्वांनी कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल सुरक्षा अभियानचे आभार मानले व चळवळी सामावून घेण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.विलास पवार यांनी आपण वर्षभर रस्ता सुरक्षा विषय कार्यक्रम राबवण्यात व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सातत्याने असे कार्यक्रम करत राहणार आहोत व आपण सुद्धा यात सहभागी व्हावे असे उपस्थितांना आवाहन केले व कार्यशाळेची सांगता झाली असे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *