मुंबईत पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, पाहा हवामान खात्याचा अंदाज

राज्यातील वातावरणात दर दिवसाला बदल पहायला मिळतोय. राज्यामध्ये काही भागांत थंडी जाणवतेय, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय. मुंबईमध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत दुपारपासून ढगाळ वातावरण राहणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे. मात्र तरीही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत थंडीचा सिझन संपणार आहे. यावेळी हवामान तज्ज्ञांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 मुंबईसाठी सध्या कोणताही अलर्ट नाहीप्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात रविवारी आणि सोमवारी दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही हेच दृश्य पाहायला मिळणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूरसह काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र मुंबईमध्ये पावसाची शक्यता नसल्याने कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *