भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धोबीपछाड देत तब्बल भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण:

भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धोबीपछाड देत तब्बल भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण:

1965 मध्ये भारताने पाकिस्तानशी युद्धात ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1965 चं भारत-पाक युद्ध भारताच्या दृष्टीने  अतिशय महत्त्वाचं होतं. या युद्धानंतर अवघ्या जगाने भारताची खऱ्या अर्थाने दखल घेतली, असे म्हटले जाते. अशा या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद विजयासंबंधित महत्त्वाच्या 30 घटना :

1962 साली भारत आणि चीनमध्ये झालेल्या युद्धात भारताला पराभव पत्कारावा लागला होता. यानंतर भारतीय सैन्याचं मानसिकरित्या खच्चीकरण झालं होतं आणि याच गोष्टीचा पाकिस्तानला फायदा घेण्याच्या विचारात होता.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांनी राष्ट्रपती आयुब खान यांना भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यास प्रवृत्त केलं होतं.

पाकिस्तानचे कमांडर इन चीफ जनरल मोहम्मद मूसा यांनी भारत-पाक युद्धाला विरोध केला होता.

पाकिस्तानने अमेरिकेकडून आधुनिक पॅटन टँक मिळवला होता. मात्र, भारताकडे ब्रिटनमध्ये तयार झालेले दुसऱ्या महायुद्धातील शरमन आणि फ्रेंट टँक होते.

भारतीय टँक रात्रीचे काहीच उपयोगी नव्हते. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानकडे असलेल्या टँकमध्ये हे वैशिष्ट्य होते. पाकिस्तानने रेंज आर्टलरी, आधुनिक रडारही मिळवले होते.

पाकिस्तानजवळ रात्री लढण्यासाठी क्षमता असलेले सुपरसोनिक स्टार फायटर विमान आणि सेबरही होते.

भारतीय वायुसेनेजवळ हंटर, मिस्टेयर, नेट्स, केनबराशिवाय जुने व्हँपायर जहाजही होते. मात्र, हे सारं रात्रीचं लढण्यासाठी काहीच उपयोगी नव्हतं.

पाकिस्तानने सर्वात पहिल्यांदा एप्रिल 1965 मध्ये कच्छमध्ये हल्ला केला. कच्छमध्ये भारतीय सैन्य उपस्थित नव्हतं.

लालबहादुर शास्त्रीने संसदेत चर्चेदरम्यान पाकिस्तानला इशारा दिला की, एका मोठ्या युद्धासाठी भारताला प्रवृत्त करु नये.

ब्रिटन आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर 30 जून 1965 ला भारत आणि पाकिस्तानमध्ये कच्छ सिंध करार झाला.

त्यानंतर पाकिस्तानने ऑगस्ट 1965 मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरांसाठी भोजन सुरु केलं. हा पाकिस्तानचा ऑपरेशन जिब्राल्टर होता.

वेशांतर करुन पाकिस्तानी सैन्यांनी वेगवेगळ्या 10 तुकड्या केल्या. प्रत्येक तुकडीला एक कोड नाव देण्यात आले होते.

पाकिस्तानने त्यांना जिब्राल्टर फोर्स नाव दिलं होतं. त्यामध्ये 30 हजारहून अधिक सैन्य होतं.

28 ऑगस्टला सकाळी 10 वाजता हाजी पीर दर्ग्यावर भारताने वर्चस्व मिळवलं होतं. भारतीय सैन्याने हाजी पीरवर तिरंगहा फडकावून विजय साजरा केला.

1 सप्टेंबर 1965 च्या सकाळी 4 वाजता पाकिस्तानच्या दोन इनफेंट्री डिव्हिजन जवळपास 70 टँकांच्या नेतृत्तावत जोहारिया सेक्टरमध्ये अचानक हल्ला केला.

भारतीय वायुसेनेने जवळपास दीड तासांनंतर पाकिस्तानी सैन्याचे 13 टँक, दोन मोठ्या तोफा आणि जवळपास 62 गाड्यांवर हल्ला करुन जमीनदोस्त केल्या.

पंजाब आणि राजस्थानच्या सीमा पाकिस्तानला मिळत असल्याने लाल बहादुर शास्त्री यांनी या दोन्ही ठिकाणी फ्रंट उघडण्याचे आदेश दिले.

6 सप्टेंबरला युद्धाला सुरुवात करत भारतीय सैन्य आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन इच्छोगिल नहरपर्यंत पोहोचले.

6 सप्टेंबरच्या रात्री पठाणकोट, हलवारा आणि आदमपूर विमानतळावर पॅरेशूटच्या माध्यमातून पाकिस्तानने कमांडो उतरवले. मात्र, त्या सर्वांना भारतीय सैन्याने घेरले.

भारतीय वायुसेनेचे प्रमुख अर्जुन सिंह यांनी देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी चर्चा केली. शत्रूंना सडेतोड उत्तर द्या, असा आदेश संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिले.

19 सप्टेंबरला पाकिस्तानने गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांच्या विमानावर भ्याड हल्ला केला. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह तिघांचा मृत्यू झाला.

8 सप्टेंबरच्या सकाळी चीमा गावातील अब्दुल हमीदने जेव्हा पाकिस्तानी टँक येताना पाहिले, तेव्हा ते एकटेच त्यांच्याशी लढले.

त्यानंतर पाकिस्तानी सैन्यामध्ये धावपळ झाली आणि बघता बघता पाकिस्तानी टँक उद्ध्वस्त झाले.

फिल्लौर नावाच्या क्षेत्रात भारत आणि पाकिस्तानमध्ये टँकची सर्वात मोठी लढाई सुरु झाली. लेफ्टनंट कर्नल एबी तारापोर यांच्या हुशारीमुळे पाकिस्तानला मागे हटावं लागलं.

पाकिस्तानच्या डोंगरांमध्ये भारतीय सैन्याने सलग 27 तास शत्रूंचा सामना केला. पाकिस्तानी सैन्य लपून-छपून हल्ला करत होते.

7 ते 20 सप्टेंबरपर्यंत सियालकोटमध्ये मोठं युद्ध झालं. चहूबाजूंना टँकमुळे धूळ उडत होती.

20 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये युद्ध थांबवण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला. 22 सप्टेंबरला भारत-पाक युद्ध थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

23 सप्टेंबरच्या सकाळी तीन वाजता गोळीबार बंद झाला. युद्ध संपल्याचं तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी जाहीर केलं.

हवालदार अब्दुल हमीद आणि लेफ्टनंट कर्नल एबी तारापोर यांना मरणोत्तर परमवीर चक्र दिलं गेलं.

जगप्रसिद्ध टाईम मासिकाने भारतीय सैन्याच्या या ऐतिहासिक विजयाची आणि भारतीय सैन्याच्या लढवय्या वृत्तीची दखल घेतली होती. कौतुकाची थापही दिली होती.

ब्लेझ ऑफ ग्लोरी : १९६५ च्या भारत-पाक युद्धातील विजयाचा सुवर्ण महोत्सव

 १९६५ सालच्या ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये भारत – पाकिस्तान युद्धाला आता पन्नास वर्षे पूर्ण झालीत. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धोबीपछाड देत तब्बल लाहोरपर्यंतचा भाग जिंकला होता… पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन जिब्राल्टर या नावाने ओळखल्या केलेल्या कुरापतीने या युद्धाची सुरूवात झाली. याच युद्धात दुसऱ्या जागतिक युद्धानंतर प्रथमच सर्वात मोठ्या प्रमाणावर रणगाड्यांचा वापर करण्यात आला.  ६ सप्टेंबर १९६५ रोजी भारताच्या विजयाने युद्धविराम झाला. या विजयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने संरक्षण मंत्रालयाने एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केलीय. ब्लेझ ऑफ ग्लोरी… भारतीय सैन्याच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *