अमेरिकेत धावणार गुगलच्या चालकरहित गाडया

अमेरिकेत धावणार गुगलच्या चालकरहित गाडया

गुगलच्या चालकरहित गाडय़ा लवकरच अमेरिकेतील रस्त्यावर यंदाच्या उन्हाळ्यात धावणार आहेत. या गाडय़ांच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतर या गाडय़ा रस्त्यावर आणण्यात येतील.

ही गाडी चालकाशिवाय धावणार आहे, मात्र गरज पडल्यास चालक या गाडीचे सारथ्य हाती घेऊ शकतो. कॅलिफोर्नियाच्या माऊंटन व्ह्यू भागात अनेक चालकरहित गाडय़ांच्या चाचण्या होत आहेत.

या गाडय़ांनी आतापर्यंत ११ किरकोळ अपघात केले आहेत. गुगल या प्रकल्पावर २०१० पासून काम करत आहेत. डेड्राईड येथील रोश इंडस्ट्रीज वाहन कंपनीने या गाडय़ांची जोडणी केली आहे. या गाडीमध्ये लेक्सस आरएक्स ४५० ए हे तंत्रज्ञान वापरले आहे, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

गुगलच्या अभियंत्यांनी या गाडीचे २५ मॉडेल्स बनवले आहेत. आणखी ५० ते १०० मॉडेल्स बनवण्यात येणार आहेत. ही कार पूर्णपणे संगणक चालवणार आहे. या गाडीचा वेग तासाला ४० किलोमीटर असेल. ही कार दोन सीटर असून हेडलाईट्स, ब्रेक्स आदी सर्वच बाबी संगणक चालवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *