आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोदींवर टीका

आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली असून, वॉल स्ट्रीट जर्नल आणि द न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकन वर्तमानपत्रांनी मोदी सरकारच्या वर्षभराच्या कारभारावर टीका केली आहे.

मोदी सरकारला घोषणाबाजीपलीकडे काहीही साध्य करता आलेले नाही असे अमेरिकन माध्यमांनी म्हटले आहे. मोदींनी त्यांच्या योजनांची हवा निर्माण करण्यापलीकडे काहीही केलेले नाही.

मेक इन इंडिया त्याचे उदहारण आहे. या योजनेचा फक्त गाजावाजा झाला आहे. मोठया प्रमाणावर असलेल्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मितीचा वेग मंद आहे. दृश्य स्वरुपात विकासाचे परिणाम दिसून आलेले नाहीत असे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे.

मोदी सरकारसाठी उत्साह, उल्हासाचे दिवस संपले असून, आता समोर आव्हान आहे. बदल आणि आर्थिक समृध्दीसाठी भारतीय मतदारांनी मोदींना पूर्ण बहुमत दिले. उत्पादन वाढीसाठी मोदींनी मेक इन इंडिया मोहिम सुरु केली. पण या मोहिमेचा फक्त गाजावाजच दिसत आहे. एप्रिलमध्ये सलग पाचव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे.

कॉर्पोरेट नफ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही असे वॉल स्ट्रीट जर्नलने मोदी सरकारच्या वर्षपूर्तीवर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. परदेशातून सध्या भारताचे आशादायक, सुखावणारे चित्र दिसते आहे.

भारत चीनला मागे टाकून अर्थव्यवस्था वाढीमध्ये वेगाने पुढे जाईल असा अंदाज आहे. मात्र देशातंर्गतच रोजगार निर्मितीचा वेग मंद आहे. राजकीय विरोधकांनी मोदींना अडचणीत आणले आहे. त्यांच्या दोन महत्वाच्या सुधारणा कार्यक्रमांना खीळ बसली आहे. त्यांना गरीब आणि शेतकरी विरोधी ठरवण्यात आले आहे. मोदींनी आता वास्तवाचा सामना करायला हवा असे  म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *