खरीप हंगामात तुरीसह अन्य कडधान्यांच्या लागवडीत झालेली घट आणि कडधान्यांच्या काढणीच्या वेळी बसलेला अवकाळीचा फटका, यामुळे देशात तूर आणि मुगाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. तसेच आयात केलेली तूर ग्राहकांच्या पसंतीस उतरत नसल्यामुळे किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १६० ते २०० रुपयांवर गेले आहेत.
खरीप हंगामातील तूर बाजारात येऊ लागली आहे. तुरीला २०२४ साठी केंद्र सरकारने सात हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. पण नव्या तुरीची आवक होताच बाजारातील दर सरासरी नऊ ते १० हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले आहेत. काढणीच्या वेळी तूर पावसात भिजल्यामुळे दर्जा घसरला आहे. खरेदी केलेली तूरडाळ मिल्समध्ये प्रक्रियेसाठी नेल्यानंतर उताऱ्यात घट दिसून येत आहे. एक क्विंटल तुरीपासून जेमतेम ६० ते ७० किलो तूरडाळ तयार होत आहे, तीही अपेक्षित दर्जाची नसते. एक किलो तुरीपासून तूरडाळ तयार करण्याचा खर्च साधारण ३० ते ४० रुपये आहे. प्रति क्विंटल सरासरी दहा हजार रुपयांनी खरेदी, प्रति क्विंटल चार हजार रुपये प्रक्रिया खर्च आणि उताऱ्यात होत असलेली घट आदी कारणांमुळे तुरडाळीचे दर सरासरी १६० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहेत, अशी माहिती कडधान्यांचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.