दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) समन्स बजावलं आहे. चौथ्यांदा ईडीनं केजरीवाल यांना समन्स बजावलं आहे. याआधी केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. बजावलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा केजरीवालांनी केला होता.
याआधी केजरीवाल दोन नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि ३ जानेवारीला ईडीसमोर हजर झाले नव्हते. भाजपा लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी मला अटक करू पाहत आहे, असा आरोप केजरीवालांनी केला होता. “ईडीच समन्य बेकायदेशी असल्याचं माझ्या वकिलांनी सांगितलं होतं. भाजपा मला लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी अटक करू पाहत आहे,” असं केजरीवालांनी म्हटलं होतं.
