ओजस मिटविणार नागपूरचा २३ वर्षांचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ

 आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण पदक जिंकून नागपूर शहराचे नाव करणारा युवा खेळाडू ओजस देवतळे शहराचा २३ वर्षांचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ मिटविणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर नागपूरच्या खेळाडूला आज मंगळवारी राष्ट्रपतीच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान केला जाणार.

२१ वर्षीय ओजस देवतळे आपल्या कुटुंबियांसह पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. ओजसचा जन्म होण्यापूर्वी शहरातील विजय मुनीश्वर आणि जोगिंदर सिंह बेदी यांना २००० साली अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. २००० सालानंतर शहरातील कुठल्याही खेळाडूला हा पुरस्कार मिळाला नाही. २००० पूर्वी १९९६ साली नीता दवडे यांना कबड्डीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तब्बल २३ वर्षांनंतर शहराचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ संपवल्यामुळे शहरातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *