वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गुरुवारी रात्री महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुहानी ढोले (वय १९) रा. धाराशिव असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सुहानीने आत्महत्येचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत आपण आत्महत्या करीत असून त्यासाठी कोणाला जबाबदार धरू नये असे लिहिले असल्याचे समजते. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे.
कर्मचाऱ्यांनी खिडकीतून आत पाहिले असता सुहानी पंख्याला लटकलेली दिसली. डॉ. जतकर यांनी पोलिसांना कळविले. शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता सुहानी मृत झाल्याचे आढळून आले. त्यानतंर पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला. डॉ. जतकर यांनी सुहानीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी तिचे वडील व मामा यवतमाळला पोहचले. दुपारी मृतदेह घेऊन धाराशिवला रवाना झाले. तिला आत्महत्येमुळे आईवडिलांना व वसतिगृहातील विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला आहे.
