शरीर सुखाला विरोध केल्याने कोल्हापुरात महिलेची हत्या; उसाच्या फडासह पेटवून दिला मृतदेह

शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्याने महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील अजारा तालुक्यातील भादवण उघडकीस आली आहे. हे प्रकरण समोर येऊ नये मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फड पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत योगेश पांडूरंग पाटील (वय 35 ) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

भादवण व भादवणवाडी रस्त्यावर दीपक खुळे, आनंदा देवरकर यांच्या उसाच्या शेताला गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान आग लागली होती. ती आग विजवण्यासाठी ग्रामस्थ गेले असता त्या ऊसात पीडित महिलेचा जळालेला मृतदेह आढलून आला. सुरुवातीला ऊसाच्या फडासह जळाल्याने सदर महिला मृत पावली असल्याचे दिसत असले तरी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. ऊस कशामुळे जळाला व ती महिला तेथे कशी गेली ? ऊस पेटला की पेटवला ? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात होते.

आजरा पोलिसानी या घटनेची गंभीर दखल घेवून या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला होता. त्यावेळी या महिलेचा घातपात झाल्याचे सामोरं आल. मृत महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत राहत होती. गुरुवारी संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील याने दुपारच्या सुमारास भादवण ते भादवणवाडी रस्त्यावर महिलेला गाठून बाजूला असलेल्या उसाच्या फडात ओढत घेऊन गेला. यावेळी योगेश याने महिलेवर बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली. मात्र त्यावेळी महिलेने त्याला विरोध केल्याने संशयित आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. दरम्यान ही घटना कोणाला कळू नये यासाठी महिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकले आणि तो पेटवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *