ठाण्यात भाडेतत्वावरील सदनिकांमध्ये घुसखोरी सुरुच, ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना महापालिकेचे टाळे

शहरातील धोकादायक इमारती, रस्ते रुंदीकरण तसेच विकास प्रकल्पातील बाधितांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेल्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांमध्ये घुसखोरीचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे महापालिका प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहीमेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या सदनिका परस्पर भाड्याने देण्याचे प्रकारही वाढले आहेत. वर्तकनगर येथील दोस्ती या भाडेतत्वावरील योजनेतील इमारतीत महापालिकेने बुधवारी कारवाई केली आहे. यामध्ये ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना टाळे लावण्यात आले. त्यापैकी १२ सदनिका परस्पर भाड्याने देण्यात आलेल्या होत्या. अशाचप्रकारची कारवाई आता इतर इमारतींमध्ये केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *