पुणे : व्हाॅट्सअॅपवर पत्नी चॅटिंग करते म्हणून पतीने पत्नीला गळफास देऊन जीवे मारण्याचा केला प्रयत्न

शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “व्हाॅट्सअॅप चॅटवर सतत का बोलते?” असे म्हणत राग मनात धरून पतीने दारूच्या नशेत पत्नीला गळफास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती विकी रमेश सोनवणे आणि सासरे रमेश तुकाराम सोनवणे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी नेहमी सोशल मीडियाचे माध्यम असलेल्या व्हाॅट्सअॅपवर चॅटिंग करत असायची. हाच राग मनात धरून आरोपी पती विकी रमेश सोनवणे याने पत्नीच्या गळ्याला दोरीचा फास लावला आणि सिलिंग फॅनला दोरी बांधून पत्नीला खुर्चीवर उभा करत खुर्ची खाली ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *