सोलापुरात कांदा लिलाव न झाल्याने शेतकरी रस्त्यावर

एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यामुळे त्याविरोधात शेतकरी आणि व्यापारीवर्गात असंतोष कायम असताना राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर कांदा दाखल झाला. परंतु कांदा लिलाव बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांच्या विरोधात सोलापूर-पुणे व हैदराबाद महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. नंतर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले.

गेल्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला होता. मुळातच कांदा दरात घसरण सुरू असताना काल गुरूवारी ८६ हजार ८०१ क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा दाखल झाला होता. यात कमाल पाच हजार रूपये आणि सर्वसाधारण दर २६०० रूपये मिळाला होता. दरात सुमारे तीनशे रूपयांची घसरण झाली असताना आज शुक्रवारी तेवढ्याच प्रमाणात कांद्याची आवक झाली. परंतु व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दिला. कांदा लिलाव अचानकपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

ठाणे पल्याड जाणाऱ्या रेल्वे स्थानकांमधुन लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच मालगाड्या जातात. यामुळे अनेकदा या गाड्यांमुळे उपनगरीय लोकल गाड्यांची वाहतूक मंदावते. यावर उपाय म्हणून मागील वर्षी ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान विशेष लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्यात आली होती. परंतु बहुतांश वेळा या मार्गिकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या धावत नसल्याचे दिसून येते. तर धीम्या मार्गिकेवरून बहुतांश वेळा जलद गाड्या धावत असल्याचे दिसून आले. यामुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडून पडते आणि याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. मध्य रेल्वे प्रशासनाने यावर उपाय करणे गरजचे आहे. यांसह विविध प्रश्नाची सरबत्ती प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाला समाजमाध्यमांवर केली आहे.

सकाळच्या कालावधीत अंबरनाथ बदलापूर येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. यामुळे लोकल गाड्या वेळेत धावणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु सध्या नियमित स्वरूपात गाड्या काही मिनिटे उशिराने धावताना दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्यांने पाहणे गरजेचे आहे. – रमेश महाजन, रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *