माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून ते प्रदीर्घ काळ राज्य विधिमंडळाचे सदस्य राहिलेत. विधानसभेचे माजी सदस्य होते. मालेगाव मतदार संघातील लोकप्रिय आमदार अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी राजकारणात नगरसेवक नगराध्यक्ष, महापौर , आमदार आणि राज्यमंत्री पद दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद देखील भूषविले होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माजी आमदार रशीद शेख यांचे सोमवारी ४ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता तसेच काही दिवसांपूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना नाशिक एका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.अखेर शेख यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मालेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *