चॉकलेटपासून गणपती तयार केला असून तो दुधात विसर्जित करण्यात येणार

चॉकलेटपासून गणपती तयार केला असून तो दुधात विसर्जित करण्यात येणार

मुंबईस्थित एका महिलेने चॉकलेटपासून गणपती तयार केला असून तो दुधात विसर्जित करण्यात येणार आहे. तसेच हे मिश्रण वंचित मुलांना वितरित करण्यात येणार आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि समाजातील वंचितांना उत्सवाचा आनंद देण्याचा मोठा संदेश या कल्पक आणि अनोख्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून या महिलेने देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईस्थित रिंतू कल्याणी राठोड या महिलेने 38 इंच उंचीचा 35 किलो वजनाचा चॉकलेटचा गणपती तयार केला आहे. हा गणपती तयार करण्यासाठी रितूला तब्बल 50 तास लागले. रितू यांचे स्वत:ची बेकरी आहे. याबाबत बोलताना रितू यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले आहे की, “भक्तीच्या नावाखाली पर्यावरण होत ऱ्हास करणे हे पाहून मला फार वाईट वाटले. मी विसर्जन परिसरात जाऊच शकत नाही. मद्यधुंद अवस्थेत चित्रपटातील अश्‍लील गीते मोठ्या आवाजात लावून नाचणे ही भक्ती नाही.‘ तसेच “लहान मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य देऊन तसेच पाण्याचे प्रदूषण न करता मी खरे विसर्जन करण्याचे ठरविले‘ असेही रितू यांनी पुढे म्हटले आहे. मागीलवर्षीही असाच प्रयोग केला असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे. चॉकलेटच्या गणपतीचे दुधात केलेले विसर्जन वंचितांना प्रसाद म्हणून वाटल्याने खरा बाप्पा आपल्या आत असल्याचेही रितू यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *