आईचा अंत्यविधी घरी परतल्यानंतर दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरच्या अरणगावात घडली. जनरेटरच्या धुराने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मारुती नन्नवरे, किशोर नन्नवरे या दोन सख्खा भावांसह सासरे नरहरी भोईटे अशी मृतांची नावं आहेत.
मारुती आणि किशोर यांची आई भामाबाई यांचा बुधवारी वीज पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्वजण घरी एकत्र जमले होते. मात्र घरात रात्री वीज नसल्याने जनरेटर लावण्यात आला. पण त्याचवेळी घराचे दरवाजे, खिडक्या बंद असल्याने श्वास गुदमरुन तिघांचा जीव गेल्याची शक्यता आहे.
आईच्या मृत्यूनंतर अवघ्या 24 तासात दोन मुलं आणि सासऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गावकऱ्यांवर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

