कल्याण- डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या मोहिली, बारावे, नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिकी, देखभाल दुरुस्तीची कामे येत्या मंगळवारी, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत केली जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी सांगितले.
