गोंदियात पावसाचा कहर

गोंदियात पावसाचा कहर

विदर्भात सध्या पावसाचा कहर सुरु आहे. मुसळधार पावसामुळे आईसह दोन वर्षांच्या जुळ्या मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. आईचा मृतदेह सापडला असून एक मुलगी अद्याप बेपत्ता आहे. तर एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे.

गोंदियातील सालेकसा तालुक्यातील पिपरिटोला गावातील कुवाढास नाल्यावरील ही दुर्दैवी घटना घडली.

गावकऱ्यांनी भाग्यश्री बिलोने या दोन वर्षांच्या मुलीला वाचवलं. परंतु आई भूमेश्वरी बिलोनेचा (वय 35 वर्ष) मृतदेह सापडला आहे. मात्र जयश्री बिलोने (वय 2 वर्ष) अद्यापही बेपत्ता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *