चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हृदयविकाराचा धक्का आल्याने थरारक अपघात झाला. या अपघातात बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. उत्तर दिल्लीतील कोतवली परिसरात काल दुपारी ही धक्कादायक घटना घडली.

मृतांमध्ये सूरज (21), केशव प्रसाद (48) आणि बसचालक वाजिद (40) यांचा समावेश आहे.

चालक वाजिद अली हा पूर्व दिल्लीतील रहिवाशी होता. वाजिद बस घेऊन जात असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यामुळे त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं.   त्यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनजवळ एक मिनी ट्रक आणि एक रिक्षा उभी होती. त्या दोन्ही वाहनांना बसने धडक दिली. हा अपघात यावरच थांबला नाही. बसने आणखी पाच जणांना धडक दिली.  या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.  तर तीन जण जखमी झाले. या सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात चालक वाजिद आणि सूरज यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, दिल्लीचे परिवहनमंत्री गोपाल राय यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांनी चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *