मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प

काल पडलेल्या मुसळधार पावसामुले कामशेत – रुळाखालील खडी वाहून गेल्याने मुंबई – पुणे लोहमार्ग बंद ठेवण्यात आला होता. कामशेत येथे लोहमार्गाखालील खडी आणि भरावच वाहून गेल्यानंतर मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. ती सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रात्रभर काम सुरुच ठेवले होते.

रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली नव्हती. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या संपर्कावर परिणाम झाला. मुंबई – पुणे रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. दरम्यान, कामशेत येथे रुळाचा काही भाग पाण्याखाली गेला. त्यानंतर पाण्याच्या वेगामुळे रुळाखालील भरावच वाहून गेला. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती.

कल्याणहून खडी असलेली गाडी घटनास्थळी रवाना झाली. तसेच रात्रभर काम सुरु असल तरी पावसामुळे भराव टाकण्यात अडथळे येत होते. मुंबईकडे जाणारा मार्ग दुरुस्त करून रेल्वेने या मार्गावरूनच दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू केली. त्यामुळे गाडय़ा अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत होत्या. पुण्याला जाणारी प्रगती एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुटली. तर डेक्कन क्वीन ही गाडीही ५० मिनिटे उशिराने रवाना झाली.

मावळ परिसरात पहाटे सहापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. सकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे डोंगराला भगदाड पडले आणि मार्गावर प्रचंड वेगाने पाणी वाहू लागले. दरम्यान, आज सकाळी पावसाने उसंत घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *