पाकिस्तानी झेंडे फडकाविल्याबद्दल असिया अंद्राबीला अटक

पाकिस्तानी झेंडे फडकाविल्याबद्दल असिया अंद्राबीला अटक

दुख्तरान-ए-मिल्लत या फुटीरतावादी संघटनेची प्रमुख असिया अंद्राबी हिला जम्मू-काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकाविल्याबद्दल असिया विरोधात बेकायदा कृत्ये नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरील कारवाई अंतर्गत असियाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
असिया हिने आपल्या जम्मू येथील निवासस्थानी १४ ऑगस्ट रोजी पाकिस्ताच्या स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन करीत आपल्या समर्थकांसह पाकिस्तानी झेंडे फडकावले होते. तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रगीताचे सामहूक गायन देखील करण्यात आले होते. असियाच्या या कृत्यावरून १७ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर पोलीस ठाण्यात बेकायदा कृत्ये नियंत्रण कायद्यानुसार सेक्शन १३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन केल्यानंतर असियाने २६/११ हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद याच्या जमात-उत-दवा या दहशतवादी संघटनेच्या रॅलीला फोनवरून संबोधित देखील केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *