क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही लालबागच्या राजाच्या चरणी झाला लीन

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही लालबागच्या राजाच्या चरणी झाला लीन

गणेशभक्तांना ज्याच्या आगमनाची आस लागलेली असते तो बाप्पा अखेर तुमच्या-आमच्या घरात विराजमान झाला आहे. क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाला.

सचिन तेंडूलकरने सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सचिन, त्याची पत्नी आणि मुलं सारा आणि अर्जुन गणरायाच्या चरणी लीन झाले. लालबागच्या राजाला मनोभावे वंदन करुन तेंडुलकर कुटुंब रवाना झालं.

राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु असतानाच क्रिकेटचा देव आपल्या लाडक्या देवाच्या भेटीला आल्यामुळे भाविकांनी दोघांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *