पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीची धास्ती घेतलीय, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. मुंबईतल्या इंडियाच्या बैठकीमुळेही अनेकांना धास्ती वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
नाफेडनं केलेला तीन लाख क्विंटल कांद्याचा बफर स्टॉक नाशिकमध्ये विक्री न करता इतर राज्यात पाठवला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी हे स्पष्ट केलंय.. तसंच दोन लाख टन कांद्याची खरेदी नाशिकच्या बाजारातून सुरु करण्यात येणार असल्यानं कांद्याला चांगला भाव मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलंय.. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केल्यानंतर नाफेड आता खरेदीला सुरुवात करणार आहे.. त्यामुळे येत्या काही महिन्यात कांदा भाव वाढल्याने शेतक-याला दोन पैसे मिळू शकतील अशी आशा निर्माण झालीय.
